मी आणि माझा ब्लॉग

नमस्कार मित्रांनो , मी योगेश धनाजीराव परदेशी . मुळचा कोल्हापूरचा …. माझ शालेय शिक्षण व त्यानंतर इंटेरीअर डिझायनिंगचा कोर्स पण इथेच झाला . ते झाल्यानंतर कोल्हापुरातीलच दोन नामांकित फर्म मध्ये जॉब करून झाल्यानंतर नुकताच स्वत:चा इंटेरीअर डिझायनिंगचा स्वतंत्र व्यवसाय सुरु केला . नोकरीच्या ठिकाणी साडेदहा वर्षांच्या अनुभवामध्ये ह्याक्षेत्रातल्या विविध गोष्टी शिकायला मिळाल्या . ते शिकत असतानाच बऱ्यांचवेळा मनात यायचे कि एक अस व्यासपीठ असाव ज्याच्या माध्यमातून मी माझ्या प्रत्येक मित्राशी आपल्या माणसाशी ह्या क्षेत्रासंदर्भात मुक्तपणे संवाद साधू शकेन. ह्यासाठीच मुद्दाम मी हा ब्लॉग मराठीतूनच सुरू करतो आहे. अर्थातच ह्या ब्लॉग वर गृहसजावटी व्यतरिक्त  अधून मधून इतर विषय देखील नक्कीच share केले जातील . 
 
चला तर मग …. सुरु करूया हा प्रवास ….! आपल्या मित्रांना ह्याक्षेत्रातील माहिती पुरवण्याच्या प्रयासासाठी …. !!!

0 comments:

Post a Comment

Copyright © 2014 Preyas