माझे श्रद्धास्थान , माझे सदगुरू डॉ . अनिरुद्ध बापू

साधारण २००३ पासून मी बापूंकडे यायला लागलो . सुरुवातीला फक्त सांघिक उपसानेतच सहभागी होत असतानाच एकदा बापूंचे प्रवचन ऐकले आणि ते मनाला भिडले . तोपर्यंत आजूबाजूची परिस्थिती पाहता कुठेतरी मनात राहून राहून वाटायचे , कि खरच हि परिस्थिती बदलायला हवी . कशी ते माहित नव्हत …. पण वाटायचं तस. अगदी क्षुल्लक कारणावरून डिप्रेशन मध्ये जाणारया ह्या सध्याच्या युगात कुणीतरी पाठबळ देणारं … आत्मविश्वास वाढवणारं . खऱ्या अर्थानं "मनाला सामर्थ्य" देणारं .
 
बापूंचे विचार प्रवचनातून ऐकल्यावर त्यांचे कार्य पाहिल्यावर खात्री वाटू लागली कि , होय असचं हवं होत कोणीतरी . एक सच्चा मित्र , एक आश्वासक पाठीराखा , एक प्रबळ मार्गदर्शक …!
 
बऱ्याचदा लोक विचारतात , कि तुमचे बापू काय करतात ? त्यावर आमचे एकच उत्तर असते , आमचे बापू स्वत: भक्ती करतात व आमच्याकडून भक्ती करून घेतात . बापूंच्या प्रवचनांमधून , लेक्चर्स मधून आजपर्यंत एवढ्या विविध विषयांवर सखोल माहिती ऐकल्यावर न राहवून एक प्रश्न पडायचा , कि एखाद्याला मानवी पातळीवर इतक्या विविध विषयांची सखोल माहिती कशी काय असू शकते ? हे फक्त सदगुरू तत्त्वालाच जमू शकते . पण बापू त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये स्पष्टपणे  स्वत:च्या सहीनिशी हे मांडतात कि , 'मी कोणाचाही अवतार नाही , मी आधीही अनिरुद्धच होतो , व आजही अनिरुद्धच आहे '. 
 
मित्रानो आजवर देवाची भक्ती करायला सांगणारे बरेच भेटले , पण ती भक्ती कशी करायची हे सांगणारा भेटला तो हा एकच …. देवाकडे काय मागायचे व काय प्रार्थना करायची हे प्रेमाने समजावून सांगणारा हाच माझा सदगुरू .

0 comments:

Post a Comment

Copyright © 2014 Preyas